शैक्षणिक उपक्रम
एस.एस.सी. परीक्षा, तज्ञ-मान्यवर प्राध्यापकांच्या मार्फत मार्गदर्शन शिबीर
शिवडी-भायखळा विभगाच्या वतीने आमदार गटनेते श्री.बाळा नांदगांवकर यांच्या संकल्पनेतुन, दहावी च्या विद्यार्थी व पालक वर्गासाठी एका विशेष मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या बोर्डाच्या परीक्षेस कसे सामोरे जायचे? ताणतणाव कसा दूर करायचा? परीक्षे अगोदर तसेच परीक्षे नंतर पालकांनी विद्यार्थ्यांशी कसे वागावे? दिनक्रम कशा पध्दतीचा असावा? या बद्दल मौलिक मार्गदर्शन श्री. करंदिकर सर यांनी केले. परेलच्या नरेपार्क मैदानावर २५०० विद्यार्थी व पालकवर्गाने अलोट गर्दी केली होती. विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भिती, पालकांचे दडपण, त्यांच्या अपेक्षा, आरोग्यविषयक मार्गदर्शन, मानसशास्र अशा अभ्यासाव्यतिरिक्त विविध विषयांवर पालकांना तसेच विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवणारे अनूभवी विचार या मार्गदर्शन शिबिरातून मिळाले. मुंबईतील मान्यवर प्राचार्य, शिक्षक सौ. सोनम पराडकर, श्री. सोनावणे, श्री. अनिल शिंदे, श्रीमती डॅा. चंद्रिका देढिया आदी मान्यवरांनी आपले मार्गदर्शन पर विचार व अनुभव कथन केले. पालकांच्या तसेच मनातील अनेक शंकाचे व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देखिल या शिबिरातून त्यांना मिळाली.

मार्गदर्शन शिबिराच्या अखेरच्या सञात उत्तरपञिकेवरील माहिती व बा. हॅालोक्राफ्ट स्टिकरा या विषयी विशेष मार्गदर्शन सेवा संघाचे अध्यक्ष श्री. सुरेश शिवलकर यांनी केले. सदर मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांना नमूना उत्तरपञिका तसेच सराव प्रश्नसंचाचे वाटप करण्यात आले. पालकवर्गाला देखील मार्गदर्शन पञके वाटण्यात आली.

मुंबईत प्रथमतःच पक्ष पातळीवरून एवढ्या भव्य प्रमाणात अशा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण मुंबईतील माझ्या मध्यमवर्गीय विभागातले हुशार विद्यार्थी बोर्डात घवघवीत यश प्राप्त करून मोठे व्हावेत, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या भावनेतून हा मार्गदर्शन शिबिराचा छोटासा प्रयत्न केला आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे यशस्वी हि झाला.