रोजगार मेळावा
शिवडी विधानसभा आणि रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या वतीने विधिमंडळ गटनेते व आमदार श्री. बाळा नांदगांवकर यांच्या संकल्पनेतून झेप नवनिर्माणाकडे या अभियाना अंतर्गत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परळच्या ऐतहासिक अश्या कामगार मैदानावर हा मेळावा युवक-युवतींच्या तुडुंब गर्दीने गजबजला होता. राज्य सरकारच्या उदासीनतेचे आणि मुंबईतल्या तमाम बेरोजगारीचे ते दाहक आणि वास्तववादी असे दृश्य होते. नुकत्याच आलेल्या वरुण राजाच्या वर्षावाची तमा न बाळगता सुशिक्षित तरुण-तरुणींची गर्दी तासागणिक वाढत होती. मुंबईतल्या नामांकित आणि मानांकित अशा आस्थापनांच्या व्यवस्थापकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने हिंदुस्तान युनिलीवर, एम न एम, फोर्टीस हॉस्पिटल, लूप मोबाईल तसेच बँकिंग क्षेत्रातले एच.डी.एफ. सी., आयसीआयसीय, मुंबई महानगर बँक तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील आस्थापनांचे व्यवस्थापक आलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या मुलाखती घेऊन आपापल्या कंपनीज मध्ये रिक्त जागांची पूर्तता करून घेत होते.
सदर मेळाव्याचे उदघाटन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. आदित्य शिरोडकर, महिला उपाध्यक्ष सौ. आशाताई मामीडी , रिटाताई गुप्ता या मान्यवरांच्या उपस्थितीत ऊदघाटन सोहळा पार पडला. मेळाव्याचे आयोजन,नियोजन अत्यंत तंत्रशुद्ध आशा अभ्यासू
पद्धतीने करण्यात आले होते शिवडी विधानसभेतील तमाम कार्यकर्त्यांनी आठवडाभर या मेळाव्याच्या तयारीसाठी कंबर कसून कामाला सुरवात केली होती . त्याचेच फलित श्रेय विभागातल्या नवोदित तरुण तरुणींना रोजगार मिळून देण्यास झाले.
सका. १०. वा . सुरु झालेल्या या रोजगार मेळाव्याचे सामारोप सायं ४.०० वा करण्यात आले. जवळ जवळ ८४०० भेट दिली. जवळ जवळ ३८७० तरुण तरुणींनी या मेळाव्यात भाग घेतला आणि त्यामध्ये १४३० तरुणांना रोजगार उपलब्ध देखील जाला .
बाकी युवकांच्या संदर्भात त्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन करण्यात आले व त्यांच्या रोजगारा बददलची कार्यवाही रोजगार व स्वयंरोजगार विभागा मार्फेत करण्याचे अभिवचन देखील करण्यात आले. तसेच मर्चंट नेवीसाठी तरुणांची नोंदही करून देण्यात आली . अशा पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन ,नियोजन यशस्वीरिता करण्यात आले .
शिवडी विधान सभेतील बेरोजगार तरुण तरुणींना मिळालेल्या रोजगाराने त्यांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाने केलेल्या कार्याचे सार्थक झाले. असे समाधान श्री. आम. बाळा नांदगांवकर यांनी व्यक्त केले.
रोजगार मेळाव्याचा हा सोहळा पाहण्यासाठी शुभेच्या देण्यासाठी मनसे पक्ष्यातील असंख्य मान्यवरांनी सदीच्या भेट दिल्या . मुंबईचे माजी नगरपाल कॉंग्रेसचे नेते डॉ . जगन्नाथराव हेगडे यांनी देखील सदीच्या भेट दिली. अशा पद्धतीच्या रोजगार मेळाव्याचे आयोजन प्रतेक विधानसभा क्षेत्रात व्हावी अशी इच्छा देखिल व्यक्त बोलून दाखवली . आणी विधिमंडळ गट नेते आम. बाळा नांदगांवकर यांचे तोंड भरून कौतुक केले . रोजगार मेळाव्याच्या समारोप विभाग अध्यक्ष श्री . नंदकुमार चिले यांनी विविध कंपन्यांच्या व्यवस्थापकांना शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देवू केला . विवीध कंपन्यांच्या व्यवस्थापकांचे सहकार्य मिळाले म्हणून हा सामाजिक उपक्रम यशस्वी करू शकलो असे समारोप प्रसंगी आभार व्यक्त केले . तसेच मा . आम. बाळा नांदगांवकरांच्या मार्गदर्शनाने प्रतेक महिन्यात आसाच समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहे अशी ग्वाही देखील विभागीय नागरिकांना चिले यांनी दिली .
जेष्ठ नागरीक भवन
शिवडी व जुन्या माझगांव विधानसभेतील अभ्युदयनगर हा माझ्या मतदार संघातील एक महत्वाचा टापू. ४०/५० इमारती, सलगच असलेली जिजामाता नगर वसाहत (आंबेवाडी)असा मराठमोळ्या लोकांचा जणू एक छोटा गावच. इथे शहिद भगतसिंग मैदान अगदी खुप विस्तिर्ण आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची, ललित कला भवनाची वास्तू, समाज मंदिर हॅाल अशा वास्तू या ठिकाणी आहेत. इथे नव्हते ते जेष्ठ नागरीकांचे आश्रयस्थान. अभ्युदयनगरामधील जेष्ठ नागरीकांसाठी एक हक्काचे स्थान हवे होते. सुख-दुःखांच्या, गतकाळाच्या आठवणिंचा संवाद साधणारे एक हक्काचे घर हवे होते. वार्षिक उत्सव, सण, मेळे सर्व वयोवृध्दांची इच्छा मला त्यांच्या डोळ्यात जाणवली आणि अंतकरणाने कळली.तेव्हा अभ्युदयनगरामधील शहिद भगतसिंग मैदानासमोरील एका भुखंडावर आमदार म्हणून सामजिक कार्यातील महत्वाचे योगदान म्हणजेच दिमाखात उभे राहिलेले "जेष्ट नागरीक भवन" आजमितिस त्या ठिकाणी जेष्ठनागरीकांच्या सभा, त्यांचे कार्यक्रम, उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे होताना पहातोय तेव्हा त्यांच्या चेह-यावरचे समाधान मला खुप काहि देवुन जाते.
रे रोड स्मशानभूमी
मृत्यू हा अटळ आहे. हे शाश्वत सत्य माणूस म्हणून आपण नाकारूच शकत नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस या इथून इहलोकीचा प्रवास करायचा आहे. हि घटना मनाला दुःखदायक असली तरी त्या संकटास प्रत्येकास सामोरे जावेच लागणार आहे. अशाच इहलोकीच्या अंतिम प्रवासाचे स्थानक म्हणजे माझगांव विधानसभेतील रे रोड स्मशानभूमी. दुःखी अंतकरणाने आलेल्या आपल्या जिवाभावाच्या माणसाला अखेरचा निरोप देण्याचे ठिकाण हि स्मशानभूमी. सर्व सोयींनी उपयुक्त असावी अशी माझी इच्छा होती. त्या दृष्टीने संपुर्ण रे रोड स्मशानभूमी सुशोभित करण्याचे ठरविण्यात आले, इतकेच नव्हे तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या स्मशानभूमीत अद्दावत विद्युत दाहिनी देखील बसवण्याचे ठरवण्यात आले. दुःखी कष्टी असलेल्या आप्तस्वकिय नातलग मंडळींना बसण्यासाठी एक स्वतंञ आसन व्यवस्थेची देखील तरतूद या ठिकाणी करण्याचे ठरविले. संपुर्ण आराखडा तयार करून संपुर्ण रे रोड स्मशानभूमी नव्याने तयार करुन, सुंदर बागायत करून सुशोभित करुन, मुंबईचे महापालिका आयुक्त श्री. जयराज फाटक यांच्याहस्ते रे रोड स्मशानभूमी दि. | |२०१० या दिवशी लोकर्पण करण्यात आली
स्वस्त दरात कांदे वाटप करून महागाई विरोधात अनोखे अभियान
९ रु. दराने साखर वाटप
महिलांना वाहन प्रशिक्षण देऊन त्यांना परवाना वाटप करून रोजगार उपलब्ध करून दिला
शेतकऱ्यानकडून आणलेला भाजीपाला, अन्नधान्य स्वस्त दरात घरोघरी विक्री केली.
परप्रांतीयांची मक्तेदारी संपवणारी मराठी तरुणांची रेल्वे भरती अभ्यास मोहीम
ज्येष्ठ नागरिक ग्रंथालय - पुस्तकांचे रैक बनविले