महाराष्ट्र नवनिर्माणसेनेची स्थापना झाल्यानंतर मा. राजसाहेबा यांच्या आदेशाने मला शिवडी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. शिवडी
विधानसभेतील तमाम मायमराठी जनतेनेा राजसाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून नवनिर्माणाच्या ध्यासाने मला आमदारपदी विराजमान केले. माझ्या आयुष्यातील ईतिहासाची
पुनरावृत्ती करणारा तो क्षण मी कधीही विसरणार नाही. पुन्हा मी निमित्तमाञ ठरलो. आनंद याच गोष्टीचा आहे कि हे अहोभाग्य पुन्हा एकदा माझ्या
आयुष्यात घडले. इतिहास तर घडतच राहणार. असो महत्वाचे म्हणजे ज्या नवनिर्माणाच्या कार्यासाठी शिवडी विधानसभा मतदार संघातील जनतेने मला भरभरून मते दिली आहेत,
त्या माझ्या मतदारांसाठी त्याच्या सेवेसी विधायक कार्ये करुन त्यांच्या निवडीस सार्थ विश्वासपाञ ठरवण्याचा माझा प्रयत्न आहे.
शिवडी म्हणजे पूर्वीचा परळ विधानसभा मतदार संघ. अनेक मराठमोळ्या चाळींनी वेढलेला, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक परंतू त्यातही मराठमोळ्या चाळसंस्कृतीचा
मध्यमवर्ग बहूसंख्येने. अनेक सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करणारा मतदार संघ. आजमितिस हा मतदार संघ मोठमोठ्या सिमेंट काँक्रिट टॅावरच्या, मॅालच्या
नव्या चेहऱ्यात विराजित होवू पाहतोय. नव्या रूपास आमचाहि विरोध नाही. पण इथला मुळ भूमीपुञ, मराठी माणूस ईथेच रहावा हि अपेक्षा माञा महत्वाची. इथे कोणतीही सबब नाही. तेच तर आमचे उद्धिष्ट आहे.
माझ्या संकल्पनेत या मतदार संघाला एक नवे रूप देण्याचा प्रयत्न आहे. पाणी, मिटर आणि सांडपाणी ह्या प्रश्नांना संपुष्टात आणुन त्याहि
पलिकडे नवनिर्माणाची संकल्पना आहे. संपुर्ण दक्षिण मुंबईत लक्षवेधी ठरावी अशी सर्व स्तरातील पुस्तके उपलब्ध असणारे महाग्रंथालय मला मतदार संघात स्थापन
करायचे आहे. वैद्यकिय उपचारात अत्यंत महागड्या चाचण्या करुन जिव मेटाकूटीस आणणाऱ्या व्यवस्थेला छेद देण्यासाठी नवनविन उपकरणांसहित अद्ययावत असे
माफक दरातले पॅथोलॅाजिकल लॅब सुरु करण्याचा मानस आहे.
उत्तमोत्तम इंजिनियर्स, डॅाक्टर्स, शास्ञज्ञ,कलाकार, साहित्यीक तयार करण्यासाठी विद्यार्थी दशेतील विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देणारे वर्ग कायम
स्वरूपी सुरू करण्याचा मनोदय आहे. गरुडभरारी मोठी आहे पण अशक्य नाही. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर अशक्य असे काही नाही.
|