ध्येय व धोरणे |
- महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
- महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे. हा विचार प्रत्यक्षात आणण्याकरता पक्ष बांधील आहे. मराठी संस्कृती विस्तार, मराठी भाषा विचार, मराठीमध्ये ज्ञानकक्षा रुंदावणे, भौतिक व सांस्कृतिक विकास करणे ह्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत.
- महाराष्ट्राच्या विकासार्थ काम करण्यासाठी सर्व मराठी माणसांना - ज्यात सर्व जातींचे, धर्मांचे, पंथांचे आणि वर्गांचे लोक आले - एकत्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ध्वजाखाली त्यांना एकवटवणे ही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवश्यक मानते.
- जे मूल मराठी आई-वडिलांच्या पोटी जन्माला आले आहे ते तर मराठीच! पण त्याचबरोबर इतर भाषिकांमध्येही जो महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे, जो महाराष्ट्रावर प्रेम करतो आणि मराठी भाषा उत्तम बोलतो, आणि महाराष्ट्रात राहतो त्या माणसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणूसच मानते. त्या सर्वांची समृद्धी आणि विकास महाराष्ट्र नवनिर्माण सेना महत्त्वाचा मानते.
|
(अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा) |
|
|
|
|
संवाद साधा बाळा नांदगांवकरांशी |
|
|
|
|
|
|
|
|