हिंदूस्थानच्या भूमीवरील अनेक क्षेञात अभिमानास्पद कतृत्व गाजवणारे एकच महाक्षेञ अर्थातच महाराष्ट्र.
कला, क्रिडा, साहित्य, राजकारण, अध्यात्म, इतिहास अशा प्रत्येकात महाराष्ट्राचा गौरव आहे. महाराष्ट्राच्या मातीतून अभिजात कलावंताची, रणधुरंधरांची, सेवाभावी सत्पुरूषांची, खगोल विचारवंतांची, साहित्यकारांची जागतिक किर्ती करणारी महागाथाच निर्माण झाली आहे.मायमाउली ज्ञानेश्वरांपासून तुकोबा नामदेवापर्यंत धर्म संस्कृती परंपरा यांचे संरक्षण करत हिंदवी स्वराज्य स्थापणारे शिवप्रभु छञपती शिवराय, या भुमीला पारतंञ्याच्या जोखडातुन स्वतंञ क्रांतीकारी चळवळ उभारणारे आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके,जहाल विचारांनी देशात स्वातंञ्याचे रणशिंग फुंकणारे लोकमान्य टिळक, स्वा. वीर सावरकर, आगरकर, चाफेकर, राष्ट्रसेवेसाठी समर्पित झालेले विनोबा भावे, सानेगुरुजी, महात्मा फुले, डॅा. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्र साकारला.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत , विकासात्मक भरारीत ज्या ज्या थोर माउलींचे, महापुरुषांचे योगदान आहे त्या सर्व दैवरूपी चरणांवर नतमस्तक होण्यास मला अभिमान वाटतो.
|| मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा ||
|